मुंबई(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०५.०७.१९
सिधुंदुर्ग- मुंबई-गोवा महामार्गावर चिखल खड्डे यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या रोषाला आज महामार्ग उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना सामोरे जावे लागले. अभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जाणवली पूल पर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांचे वस्तुस्थिती दाखवली. आ. नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी खेडेकर यांना गडनदी पुलाला बांधून ठेवले एवढेच नव्हे तर सर्वसामान्य जनता रोज जो चिखल मारा सहन करतोय, तो तुम्ही पण आज अनुभवावा असे म्हणत आमदारांनी शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या तसेच संपूर्ण कणकवली नगरी तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असे सांगत आमदार नितेश राणे यांच्यासह स्वाभिमान कार्यकर्त्यांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जाणवली पूल पर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांचे वस्तुस्थिती दाखवली.



















