पिंपरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अमर सूर्यवंशी
दि.६.०५.१९
बोपोडीतील राहवाशी, नागरिक मच्छराच्या अतिरेका मुळे डेंगू, मलेरिया आदी आजाराने हैराण झाले होते. या कडे ना कुठलाही प्रतिनिधी,महानगरपालिका अधिकाऱ्यांचे लक्ष… पण याकडे लक्ष दिले ते भीम आर्मी संघटनेचे बोपोडी अध्यक्ष गौतम काटे यांनी या विरोधात राकेश कांबळे’,उमेश शेळके सह स्थानिक राहवासी सोबत घेत मोफत मच्छर अगरबत्ती वाटप करून या घटनेचा निषेध केला होता. या घटनेची दखल घेत निर्भिड पत्रकारने बातमी लावताच अवघ्या दोन दिवसांत आरोग्य विभागाला जाग आली आणि या परिसरात मनपा अधिकाऱ्यांनी धुर फवारणी सुरू केली. धुर फवारणी करून घेताना. या वेळी उपस्थित भिम आर्मीचे शिवाजीनगर मतदार संघ प्रमुख मा.गौतमभाऊ कोटे, बोपोडी शाखा सरचिटणीस मा. श्रीकांत मनोहर सर्वानी निर्भीड पत्रकारचे आभार व्यक्त करत अभिनंदन केले.



















