सातारा (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, सुभाष जाधव
दि.१६.१२.१९
फलटण- न्यू फलटण शुगर वर्क्स साखर कारखाना अनेक दिवस बंद होता शेतकरी व कामगारांची कोट्यावधी रुपयांची देणी थकल्यामुळे फलटण तालुक्यात सह इतर भागातील शेतकरी अडचणीत आला होता न्यू फलटण आर्थिक अडचणीत सापडल्याने मागील हंगाम बंद होता त्यामुळे साखर वाडीतील साखर कारखान्यांच्या कामगारांच्या वर आर्थिक संकट कोसळले होते येथील बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल मंदावली असताना अनेक बँका व्यापारी यांची देणी थकीत होती कॉसमॉस बँकेने न्यु फलटणला २५ कोटी दिले होते अशा अवस्थेत एनसीएलटीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले ऊस उत्पादकांचे ४९ कोटी तर काम गारांचे पंधरा-सोळा महिन्याचे पगार अन्य देणी मिळाली पाहिजेत असा शेतकरी संघटनेचा कायम आग्रह होता.
तसा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उच्च न्यायालयात यासंबंधी दावा दाखल केला यावरून एनसीएलटीने न्यू फलटण शुगर कारखाना दत्त इंडिया शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हस्तांतरित केला या कंपनीने थकीत देणी टप्प्याटप्प्याने देण्याची जबाबदारी स्वीकारली असता प्रथम १४ कोटी रुपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केले प्रत्यक्ष कारखाना चालू होऊन ऊस गाळपाला सुरुवात झाली ही शेतकरी कामगारांच्या दृष्टीने आनंदाची बाब असल्याने या भागातील हा साखर कारखाना म्हणजे शेतकरी व कामगारांची आर्थिक नाडीच असल्याचे स्वाभिमानी शेतकरी युवा आघाडीचे अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाध्यक्ष नितीन यादव संघटनेचे सरचिटणीस डॉक्टर घाडगे, शहराध्यक्ष सचिन खांविलकर, प्रमोद गाडी दादा जाधव, सुभाष जाधव सांगितले.
आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊस उत्पादकांचे आणि कामगारांचे थकीत बिल मिळावे म्हणून वेळोवेळी लढा दिला आता बंद पडलेला कारखाना दत्त इंडिया सुरू केला असता तरी शेतकऱ्यांची व कामगारांची संपूर्ण बिले मिळावेत ही आमची भूमिका कायम राहील असल्याचेही महामुलकर यांनी सांगून साखरवाडी चा कारखाना चालला तर या भागातील दळवळण वाढून गती येईल व्यापारी बाजारपेठेत पैसा फिरेल कामगार शेतकरी सुखी होईल एकंदरीत कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना न्याय मिळेल आणि येथील भागाच्याआर्थिक वैभवात भर पडण्यासाठी आमचे सहकार्य कायम राहील त्यासाठी आम्हाला कारखाना व्यवस्थेने आमच्या मागण्यासाठी सहकार्य करावे तसे झाल्यास आमचेही सहकार्य कायम राहील असेही मत धनंजय महामुलकर यांनी जमतला दिले आहे.



















