चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,योगेश्वर पि. शेंडे
दि.१५.११.१९
नागभिड- तालुक्यातील बाळापुर पंचायत समिती अंतर्गत मौजा बाळापुर बुज येथे “आमचा गाव आमचा विकास” अंतर्गत गण स्तरीय कार्यशाळा चे आयोजन बाळापूर बुज येथे १३,१४ नोव्हेंबर १९ ला बाळापूर येथील ग्राम पंचायत च्या सभागृहात ही कार्यशाळा पार पडली त्या कार्यशाळेला उपस्थित श्री तिवारी साहेब, वि. अ. कृषी , गेडाम मैडम, पर्यवेक्षिका यांनी कार्यशाळा करिता उत्तम मार्गदर्शन करून यशस्वी केले.
तसेच मा.श्रीमती प्रणाली खोचरे गट विकास अधिकारी यांनी कार्यशाळेचे नियोजन, मार्गदर्शन, सहकार्य केले
आणि प्रशिक्षनार्थी म्हणून पंचायत समिती गण बाळापूर बुज अंतर्गत बाळापूर बुज, आकापूर, गंगासागर हेटी, बोंड, देवपायली, मिंडाळा, चिंधिचक येथिल ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्तरीय कर्मचारी, बचत गट प्रतिनिधी, आशा वर्कर,, अंगणवाडी सेविका इत्यादी उपस्थित होते. कार्यशाळेला सन्माननीय जि.प. सदस्य संजयभाऊ गजपूरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उत्तम नियोजन व व्यवस्था ग्रामपंचायत बाळापूर बुज यांनी केले. यासाठी सरपंच रेवताताई कन्नाके, उपसरपंच ज्ञानेश्वर गुरनुले, सदस्य भगवान डहारे तसेच सर्व सदस्यांचे व ग्राम सेवक श्री.मेश्राम सर यांचे या कार्यशाळेला सहकार्य लाभले.



















