चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.१०.१९
चिमूर- पळसगाव (पि) येथील अखिल भारतीय बौद्ध महासभा व महामाया महिला मंडळ च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने आज ६३ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजन केले होते या वेळीं महाकरूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मा.दामोदर रामटेके अध्यक्ष,प्रभाकर गजभिये सचिव यांच्या हस्ते मालाअर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षित समाजाच्या न्यायासाठी बाबासाहेबांनी कशाचीही पर्वा केली नाही म्हणूनच आज तुम्ही आम्ही ताठ मानेने जगत आहोत, बाबासाहेब आंबेडकरांकडे प्रचंड गुणसंपदा होती. सायकाळी ६ वाजता धम्म धव्यजाचे मा.दामोधार रामटेके अध्यक्ष अखिल भारतीय बौद्ध महासभा यांच्या हस्ते धव्यजरोहन करम्यात आले.सायंकाळी ७ वाजता स्नेहभोजन चा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमास उपासक उपसकांनी मोट्या संख्यनी उपस्थिती होती. आदीवासी समाज बांधवाची एकता विजयादशमी (दसरा) निमित्ताने आदिवासी गोंड बांधवांनी पेरसापेन चौकात दुपारी १ वाजता रावणाच्या प्रतिमेची मिरवणूक काढत विधिवत व पारंपरिक पद्धतीने रावण पूजनचा कार्यक्रम करण्यात आला. दुपारी पेरसापेन पळसगांव येथील आदिवासी मोहल्यात पटांगणावर भूमक हस्ते रावणाच्या प्रतिमेचे भरतीपूजन व रावण ताटी करण्यात आली. त्यानंतर समस्त आदिवासी बांधवांनी रावण ताटी तसेच नृत्याचे सादरीकरण करून गावातून रॅली काडून संचलन केले. आदिवासी समाजात रावणाला राजा मानले जात असल्याने विजयादशमीच्या (दसरा) दिवशी रावणाचे पूजन करण्याची प्रथा आहे. रावणाचे माहात्म्य सांगून रावणाचे पूजन का करावे याबाबतची माहिती विशद केली. आदिवासी समाजात रावणाला देव मानतात त्यामुळे रावणदहन थांबवावे, असा संदेश रावणपूजन करून देण्यात आला. आदिवासी गोंड बांधवांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला सुरेश कुंभरे ,जालिंद कुंभरे, भक्तदास कोहचडे, छत्रपल मसराम,सुनील कुंभरे,विलास कोहचडे,छत्तीस मडावी,दिनकर कुंभरे यांच्यासह आदिवासी मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.विजयादशमी (दसरा) निमित्ताने आदिवासी गोंड बांधवांनी पेरसापेन चौकात दुपारी १ वाजता रावणाच्या प्रतिमेची मिरवणूक काढत विधिवत व पारंपरिक पद्धतीने रावण पूजनचा कार्यक्रम करण्यात आला.
दुपारी पेरसापेन पळसगांव येथील आदिवासी मोहल्यात पटांगणावर भूमक हस्ते रावणाच्या प्रतिमेचे भरतीपूजन व रावण ताटी करण्यात आली. त्यानंतर समस्त आदिवासी बांधवांनी रावण ताटी तसेच नृत्याचे सादरीकरण करून गावातून रॅली काडून संचलन केले. आदिवासी समाजात रावणाला राजा मानले जात असल्याने विजयादशमीच्या (दसरा) दिवशी रावणाचे पूजन करण्याची प्रथा आहे. रावणाचे माहात्म्य सांगून रावणाचे पूजन का करावे याबाबतची माहिती विशद केली. आदिवासी समाजात रावणाला देव मानतात त्यामुळे रावणदहन थांबवावे, असा संदेश रावणपूजन करून देण्यात आला. आदिवासी गोंड बांधवांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला सुरेश कुंभरे ,जालिंद कुंभरे, भक्तदास कोहचडे, छत्रपल मसराम,सुनील कुंभरे,विलास कोहचडे,छत्तीस मडावी,दिनकर कुंभरे यांच्यासह आदिवासी मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.



















