(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी , विकास खोब्रागडे
दि.०७/१०/२०१८
चिमूर : पळसगाव वनपरीक्षेत्रतील बफर झोन अंतर्गत पळसगाव वनपरीक्षेत्रतील गावामध्ये दिनाक १ते ७ आक्टोंबर २०१८ ला विविध उपक्रम राबहून वन्यजीव सप्ताहाचे साजरा करण्यात आला सर्वसामान्य नागरिकासोबतच नव्या पिढीत निसर्ग आणि वन्यजीव याबाबतची आस्था वाढत आहे. वन्यप्राणीजंगलातून बाहेर येणे, गावकऱ्यांवर आणि त्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करणे, शेताची नासधूस करणेआणि यातून मग बदला घेण्याच्या भावनेतून वन्यप्राण्यांची शिकार करणे किंवा शिकाऱ्यांना मदत करणेयासारखे प्रकार वाढीस लागले आहेत. वनविभाग आणि गावकरी यांच्यात त्यामुळे मोठी दरी निर्माण झाली आहे. ही दरी कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वन्यजीव सप्ताहाचे आयोजन आहे. वन्यजीव वाचले, तर आपले भविष्यही पर्यावरणपूरक असेल त्यांच्या अभिव्यक्तीस वाव देण्यासाठी व त्याद्वारे जागृती निर्माण करण्यासाठी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहनिमित्ताने वन विभागाच्या वतीने विविध स्तरावर निबंध, चित्रकला व छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आदीवासी आश्रम शाळा व वनविभाग च्या वतीने बोरकर सर व मुरकुटे मॅडम वनपरीक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनात लोखंडे साहेब वनपाल .गेडाम साहेब वनरक्षक यांचा उपस्थितीत वनविभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताह निमत्य रॅली काढण्यात आली व (वि.व्या.स.दल)यांच्या वतीने सुद्धा वन्यजीव सप्ताहा बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व अदिवासी आश्रम शाळा मध्ये विध्यार्थ्यासाठी विविध स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते इयत्ता ८ वी ते १० वीसाठी वन्यजीव सप्ताह साजरा निबंध आणि इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.सुरक्षीत पर्यावरण उन्नतेचे साधन अशा विषयावर स्पर्धा घेण्यात आली. व १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी पक्षाचे घरटे हा विषय चित्रकला स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आला आहे.स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक म्हणून रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले. सदर बक्षीस वितरनाच्या समारोपास मा गीता शेंडे सरपंच,रागिना दडमल पोलीस पाटील,सुनील ठाकरे अध्यक्ष,कामडी सर मु.अ.,धारणे सर,ठवरे मॅडम,मेंडुळकर मॅडम,पेंदाम मॅडम,सर्व शिक्षकवृंद,लोखंडे सर,गेडाम साहेब,दुर्योधन खोब्रागडे,यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम साजरा करण्यात आला.



















