नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,शांताराम दुनबळे
दि.५.११.१९
जामगाव- अवकाळी पावसामळे नुकसान झालेल्या शेतीपिकाचे पंचनामे करणाऱ्या ग्रामसेवकास पास्ते येथे एका शेतकऱ्याने अरेरावी, शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा प्रकार रविवारी (दि.३नोव्हेंबर) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडला. याबाबत ग्रामसेवक जयवंत साखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पास्ते येथील अशोक विष्णू घुगे याच्याविरोधात सिन्नर पोलिसांत सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी ग्रामसेवक साखरे हे पास्ते शिवारातील नुकसानग्रस्त शेतीपिकांची पाहणी करून पंचनामे करत होते. जामगाव-पास्ते शिवारात शेत गट नंबर ६१४ मध्ये मारुती घुगे, बाळू घुगे या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी सुरू असताना अशोक विष्णूघुगे हे पिकअपगाडीतून तेथे आले. यावेळी त्यांनी ग्रामसेवक जयवंत साखरे यांना माझ्या पीक नुकसानीचे पंचनामे केव्हा करणार अशी दरडावून विचारणा केली. तुमच्या भागात आल्यावर पंचनामा करू, असे सांगितले. मात्र, त्यावर अशोक घुगे यांचे योग्य समाधान न झाल्याने त्यांनी आताच चला असा आग्रह धरला. त्यावर गाडीतन उतरून तुमचे शेत दाखवा असे साखरे यांनी म्हणताच अशोक घुगे यांनी त्यांना शिवीगाळ करत त्यांच्या गालात मारली. दरम्यान यासंदर्भात ग्रामसेवक जयवंत साखरे यांनी सिन्नर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे.



















