पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, कलिंदर शेख
दि.२५.०७.१९
पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाना काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांना याबाबतचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने देण्यात आले. या अर्जावर सूचक म्हणून नगरसेवक जावेद शेख यांची तर अनुमोदक म्हणून मोरेश्वर भोंडवे यांची स्वाक्षरी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या आदेशानंतर ही नियुक्ती झाली असल्याची माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी दिली.यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक राजू मिसाळ, राजू बनसोडे, जावेद शेख, मोरेश्वर भोंडवे आदी उपस्थित होते.



















