पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०८.०७.१९
चिंचवड- पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा चिंचवड ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात सत्कार करण्यात आला यावेळी नारी शक्ती संघटनेच्या अध्यक्षा सौ. पूजा सराफ मॅडम, पिंपरी चिंचवड आघाडीचे अध्यक्ष श्री.अभय भोर साहेब उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी, गणेश विपट गोपाळ भसे, नंदकुमार मुरडे, अरविंद जोशी, नारायण दिवेकर ,राजाराम गावडे, उषा कर्वे ,जयमाला विभुते, रमेश डोंगरे ,चंद्रकांत पारखी, अरुण घोलप, सुदाम गुरव, किरण इंगोले,दुर्गा भोर आरटीआयचे अध्यक्ष रामदासजी जंगम, पर्यावरण व जल संवर्धन समितीचे अध्यक्ष श्री.मुझफ्फर इनामदार आदी लोक उपस्थित होते.



















