पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,दिलीप देहाडे
दि.१.१०.१९
पिंपरी विधानसभा मतदार संघातून प्रवीण ऊर्फ बाळासाहेब गायकवाड यांना वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवारी जाहीर पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,दिलीप देहाडे दि.१.१०.१९ पिंपरी- पिंपरी चिंचवड शहराचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक सक्षम उमेदवार असावा या साठी स्वत: शहराध्यक्ष मा.इंजि.देवेंद्र तायडे आग्रही होते.या साठी स्वतः किंग मेकरच्या भूमिकेत राहुन सक्षम उमेदवाराला प्राधान्य आणि संधी देण्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वी एका खासगी वहिनीला दिलेल्या मुलाखतीत जाहीर देखील केले होते.पिंपरी विधानसभा मधे पक्षाची ताकत असुन एका युवा व सक्षम असा उमेदवार या विधानसभेला मिळावा ज्याचा अनुसूचित जातींव्यतिरिक्त इतर समाज घटकांशी जवळचा संबंध असावा जेणेकरून विजयासाठी आवश्यक असणाऱ्या उर्वरित १० ते १५ हजार मतदारांपर्यंत पोहचता येईल आणि पक्षाचा आमदार त्या ठिकाणी निवडून आणता येईल आणि पिंपरी विधानसभेतील विजयासह येथील महापालिकेची सत्ता देखील सहज हस्तगत करता येईल अशी भूमिका देखील त्यांनी या वेळी बोलुन दाखवली होती.या अनुषंगानेच त्यांनी स्वतः या जागेतून माघार घेत प्रवीण ऊर्फ बाळासाहेब गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी ते आग्रही होते. प्रविण ऊर्फ बाळासाहेब गायकवाड यांच्या निवडीने वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघ पिंपरी चिंचवड शहर यांच्या मधे उत्साह संचारला असून प्रवीण गायकवाड यांना निवडुन आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे कर्यकर्ते उत्साहाने काम करतील असे मत मा.इंजि. देवेंद्र तायडे यांनी व्यक्त केले आहे.दरम्यान प्रवीण ऊर्फ बाळासाहेब गायकवाड यांनी देखील निवड जाहीर होताचं मा.इंजि.देवेंद्र तायडे यांना दूरध्वनी वरून फोन करून मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले व साहेबांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवण्या साठी पूर्ण ताकदीने लढणार व प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. प्रवीण ऊर्फ बाळासाहेब गायकवाड हे रावेत किवळेचे रहिवासी असुन तरुण तडफदार असे व्यक्तिमत्व आहे.पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच समाजघटकांमध्ये त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे.पिंपरी- पिंपरी चिंचवड शहराचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक सक्षम उमेदवार असावा या साठी स्वत: शहराध्यक्ष मा.इंजि.देवेंद्र तायडे आग्रही होते.या साठी स्वतः किंग मेकरच्या भूमिकेत राहुन सक्षम उमेदवाराला प्राधान्य आणि संधी देण्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वी एका खासगी वहिनीला दिलेल्या मुलाखतीत जाहीर देखील केले होते.पिंपरी विधानसभा मधे पक्षाची ताकत असुन एका युवा व सक्षम असा उमेदवार या विधानसभेला मिळावा ज्याचा अनुसूचित जातींव्यतिरिक्त इतर समाज घटकांशी जवळचा संबंध असावा जेणेकरून विजयासाठी आवश्यक असणाऱ्या उर्वरित १० ते १५ हजार मतदारांपर्यंत पोहचता येईल आणि पक्षाचा आमदार त्या ठिकाणी निवडून आणता येईल आणि पिंपरी विधानसभेतील विजयासह येथील महापालिकेची सत्ता देखील सहज हस्तगत करता येईल अशी भूमिका देखील त्यांनी या वेळी बोलुन दाखवली होती.या अनुषंगानेच त्यांनी स्वतः या जागेतून माघार घेत प्रवीण ऊर्फ बाळासाहेब गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी ते आग्रही होते.
प्रविण ऊर्फ बाळासाहेब गायकवाड यांच्या निवडीने वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघ पिंपरी चिंचवड शहर यांच्या मधे उत्साह संचारला असून प्रवीण गायकवाड यांना निवडुन आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे कर्यकर्ते उत्साहाने काम करतील असे मत मा.इंजि. देवेंद्र तायडे यांनी व्यक्त केले आहे.दरम्यान प्रवीण ऊर्फ बाळासाहेब गायकवाड यांनी देखील निवड जाहीर होताचं मा.इंजि.देवेंद्र तायडे यांना दूरध्वनी वरून फोन करून मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले व साहेबांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवण्या साठी पूर्ण ताकदीने लढणार व प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
प्रवीण ऊर्फ बाळासाहेब गायकवाड हे रावेत किवळेचे रहिवासी असुन तरुण तडफदार असे व्यक्तिमत्व आहे.पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच समाजघटकांमध्ये त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे.



















