पुणे ( निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क )प्रतिनिधी,
दि.२७ सप्टेंबर २०१८
ढोले पाटील रस्ता क्षेत्रिय कार्यालय अतिक्रमण विभागामार्फत पुणे स्टेशन परिसरातील टपरीधारकांवर अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात आली आहे. क्षेत्रिय अधिकाऱ्यांसोबत विचारपूस केली असता.असे कळते की बौद्ध धर्मगुरु महास्थवीर चंद्रामनी चौक हा व्ही.आय.पी रस्ता असून ह्या रस्त्यावरून जज,कमिशनर,उच्च अधिकारी जात असतात.त्यामुळे येथिल टपरीधारकांनी रस्त्यावरील जागेवर अतिक्रमण केले असता रस्त्याचे रुंदीकरण कमी झाले आहे. त्या कारणाने ह्या भागात ट्रॅफिक समस्या खूप होत असल्याने अतिक्रमण विभागाने कारवाई केली असून टपरीधारकांचे साहित्य उचलून नेण्यात आल्या आहेत.



















