जळगाव(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क प्रतिनिधी,
दि.१३.१०.१९
जळगाव- राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. ‘पुन्हा आणुया आपले सरकार’ हे भाजपचे घोषवाक्य आणि कमळाचे चिन्ह असलेला टी-शर्ट घालून गळफास घेत एका शेतकऱ्याने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजू ज्ञानदेव तलवारे असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रचार सभे अगोदरच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. कामगार मंत्री डॉ.संजय कुटे हे जळगाव जामोद येथील आमदार आहेत. आज सकाळी ११ वाजता ही घटना समोर आली. कर्ज बाजारी मुळे त्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. अद्याप याप्रकरणी प्रशासनाकडून कोणतीही बाजू मांडण्यात आलेली नाही.जळगाव- राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. ‘पुन्हा आणुया आपले सरकार’ हे भाजपचे घोषवाक्य आणि कमळाचे चिन्ह असलेला टी-शर्ट घालून गळफास घेत एका शेतकऱ्याने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजू ज्ञानदेव तलवारे असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रचार सभे अगोदरच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. कामगार मंत्री डॉ.संजय कुटे हे जळगाव जामोद येथील आमदार आहेत. आज सकाळी ११ वाजता ही घटना समोर आली. कर्ज बाजारी मुळे त्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. अद्याप याप्रकरणी प्रशासनाकडून कोणतीही बाजू मांडण्यात आलेली नाही.



















