पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, विकास ओव्हाळ
पिंपरी, वाहतूक नियमनाऐवजी गप्पात रंगलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.या कर्मचाऱ्यांना आयुक्तालयात बोलावून सर्वांसमोर कवायत करण्याची शिक्षा दिली.आयुक्त आर.के.पद्मनाभन चिंचवड स्टेशन येथून मोटारीतून जात असतांना तेथील चौकामध्ये दोन वाहतूक पोलीस कर्तव्यावर असल्याचे त्यांनी पाहिले.मात्र ते एका बाजूला थांबून गप्पा मारत होते. कामचुकारपणा केला जात असल्याने पोलीस आयुक्तांनी संबंधित वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन त्यांना आयुक्तालयात बोलावून घेतले. चौकशीअंती त्यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याचे लक्षात आले. कर्तव्यामध्ये कसूर केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना ऑटो क्लस्टर येथील आयुक्तालयासमोर कवायतीची शिक्षा दिली. आयुक्तांच्या अश्या अनोख्या शिक्षेमुळे इतर पोलीस कर्मचाऱ्यांनीही धास्ती घेतली आहे.



















