नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,कैलास गायकवाड
दि.५.१०.१९
येवला- तालुक्यातील अंदरसूल येथील कोळगंगा नदीवर पोहण्यासाठी गेलेला तरुण किरण गरुड वय १७ याचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला तब्बल चार तासाने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनला यश आले. कोळगंगा नदी वर नागेश्वर मंदिरापासून काही अंतरावर कोळगंगा नदीवर काही मित्र पोहण्यासाठी गेले होते. त्यामधे किरण गरुड हा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला ही बातमी संपूर्ण गावात पसरली. गांभीर्य लक्षात घेता तेथील स्थानिक पोलीस अधिकारी श्रीराम शिंदे, पोलीस नाईक ज्ञानेश्वर हेंबाडे, तलाठी कमलेश पाटिल यांनी घटना स्थळी धाव घेऊन तहसीलदार रोहित वारुळे यांना फोन करून माहिती दिली याआधीच स्थानिकांनी मृत्यू देह शोधण्याचा प्रयत्न सुरु केला होता मात्र यश येत नव्हते. नंतर कोपरगाव वरून आपत्कालीन समन्वयक सुशांत घोडके यांच्या नेतृत्व खाली रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले आणि अर्ध्या तासाभरात किरणचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
किरण हा आपल्या आई वडिलांना शेतात व घर कामात मदत करून महाविध्यालयात शिक्षण घेत होता. या घटनेन संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



















