उस्मानाबाद(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,अभय गायकवाड
दि.२.१२.१९
उस्मानाबाद- गुटखा विक्री बंदी असतानाही उस्मानाबाद जिल्ह्यात गुटख्याची बेकायदा, छुप्या मार्गाने विक्री होत आहे उस्मानाबाद तालुक्यातील व परिसरातील लहान-मोठ्या दुकानांमध्ये खुलेआम गुटका विक्री होत आहे.स् थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून यापूर्वी कठोर कारवाई करुन अशा अवैध मालाच्या विक्रीवर पूर्णपणे निर्बंध घालण्याबाबत विक्रेत्यांना आवाहन करण्यात आलेले होते परंतु उस्मानाबाद जिल्ह्यात सर्रास विक्री सुरू आहे. उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथे (दि.२९)रोजी सायं. ६ वा.च्या सुमारास मौजे उपळा शिवारात नामदेव साहेबराव शिंदे व रमाकांत फुलचंद गोरे रा.हिंगळजवाडी जि.उस्मानाबाद मोटरसायकल क्रमांक एम.एच.२५एजी ८९९७ या गाडीवर प्रतिबंधित अन्नपदार्थ गुटखा व पान मसाला इत्यादी एकूण अंदाजे किंमत १११६७ रुपये किमतीचा गुटखा अवैधपणे वाहतूक करत असताना उस्मानाबाद पोलीस स्टेशन ग्रामीण यांच्या पथकास आढळला. अन्न सुरक्षा अधिकारी उस्मानाबाद यांनी नमूद प्रकरणातील जप्त केलेला गुटखा व पान मसाला महाराष्ट्र शासनाद्वारे प्रतिबंधीत असल्याची खात्री करून दि. ३०.११.१९ रोजी पोलीस ठाणे उस्मानाबाद ग्रामीण येथे हे वरील आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.



















