पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)कलिंदर शेख
दि.०५.०७.१९
बालाजीनगर- बौद्ध विहार बालाजी नगर भोसरी येथे रमाई आवास योजना घरकुल या विषयी गुरुवार(दि.०४) रोजी दुपारी बैठक घेण्यात आली. सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटना बौद्ध विहार बालाजीनगर भोसरी यावेळी या बैठकीचे अध्यक्ष स्थानी मा. सुलतान इस्माईल तांबोळी हे होते. यावेळी रमाई आवास (घरकुल) योजना तसेच पंतप्रधान आवास योजना मागणीधारक लाभार्थी ज्या जागेवर सध्या राहत आहे. त्या जागेवरच घर बांधण्यासाठी मिळणारे अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रो. बी. बी. शिंदे यांनी जमलेल्या सर्व स्त्री पुरुष नागरिकांना दिले. यावेळी आर. पी. आय.(A) वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजीज शेख यावेळी उपस्थित झाले. जमलेल्या सर्व नागरिकांनी टाळ्याच्या गजरात त्यांचे स्वागत केले. यावेळी मा.अजित शेख यांनी या सामाजिक संस्थेची केलेल्या कामाचे गुणगान व कौतुक केले.व अनेक योजने बद्दल महिलांना माहिती देण्यात आली व मार्गदर्शन केले.आजिज शेख बोलत असताना प्रा.बि.बि.शिंदे यांनी भेदभाव न करता गोरगरिबांसाठी धडपड व जे काम हाती घेतले ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही. या वयात सामाजिक काम पाहून कौतुक करावेसे वाटते संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मा. प्रा. बी.बि. शिंदे यांचा भारतीय संविधानाची प्रत(संविधान) देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या पिं. चिं.शहराच्या अध्यक्षा सायराबानू शेख.रामभाऊ ओव्हाळ. शिलाताई मांदळे. शालन ओव्हाळ. राजश्री मोहिते या प्रमुख कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. अनेक महिला पुरुष यावेळी उपस्थित होते.



















