सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२९.११.१९
फलटण- लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगाव ता. फलटण येथील विवाहित महिला २१ तारीखेपासून बेत्ता झाली असल्याची फिर्याद तिच्या पतीने लोणंद पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. सौ.पूजा केशव गोवेकर ( वय २६) ही विवाहित महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद तिचा पती केशव गोवेकर रा.कोरेगाव ता. फलटण जिल्हा सातारा यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली आहे २१ ऑक्टों.१९ रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास सदरची महिला घरातून निघून गेली आहे तिचे वर्णन खालील प्रमाणे उंची पाच फूट वर्ण गोरा अंगाने सडपातळ काळे केस डोळे काळे अंगात निळी साडी तिला मराठी बोलते. वरील वर्णनाची महिला कोणास आढळल्यास स.पो.नि. संतोष चौधरी किंवा लोणंद पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.



















