सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.४.११.१९
फलटण- तालुक्यातील फलटणसह साखरवाडी, जिंती, सुरवडी, निंभोरे या सर्वच ठिकाणी व आजूबाजूच्या खेड्यापाड्यात मटका(अंकावर पैसे लावून खेळला जाणार अवैध जुगार) मोठ्या जोमाने व खुलेआम चालू आहे. यामध्ये प्रामुख्याने बसस्थानकाच्या व शाळेच्या आवारामध्ये आजूबाजूला, पान टपऱ्या, जुनी पडकी इमारत, गल्ली बोळात अश्या अनेक ठिकाणी मोठ्या राजरोसपणे चालू आहे, अश्या मटकाकिंगना नक्की कोण पाठबळ देत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर असणारे हे अड्डे पोलिसांना दिसत नाहीत का? काही आर्थिक देवाण घेवाण करून पोलिस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.



















