सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१६/२/१९
पाटण, नाडॊली गावातील गेली दोन अडीच महिन्यापासून बंद असलेली खडी क्रेशर चालू करून अवैध्यरित्या छुप्या मार्गाने मालाची वाहतूक सुरू असताना नाडॊली गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन सर्वांनी मिळून आपल्या खाजगी जागेतून जाणारा रस्ता त्या रस्त्यावर दगड लावून रस्ता बंद केला व खडी क्रेशरची चालू असणारी वाहतूक बंद केली तसेच सर्व गावातील ग्रामस्थांनी मिळून रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला या पुढे सर्व खडी क्रेशर कायम बंद करण्याकरता सर्व ग्रामस्थ मिळून वाहतूक होणाऱ्या रस्त्यावर ठाण मांडून बसण्याच्या तयारीत आहेत जो पर्यंत सर्व खडी क्रेशर बंद होत नाहीत तो पर्यंत आम्ही ग्रामस्थ शांत बसणार नाही असेही ग्रामस्थांनी सांगितले. परिणामी सर्व गाव मिळून खडी क्रेशर वाल्यांच्या विरोधात व त्यांना सहकार्य करणाऱ्या शासनाच्या विरोधात आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहोत याचा विचार करून शासनाने त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.



















