चंद्रपूर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क )प्रतिनिधी
दि.२६.०४.१९
चिमूर, तालुक्यातील ग्रामीण भागातील पळसगाव येथील दुर्गा माता शेती महिला बचत गटाने साधला बारमाही रोजगार जसजसे महागाई वाढत आहे, तसतशा रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत. या संधी शोधून तिचे सोनं करणेही तेवढच जिद्द,चिकाटीचे काम.जिद्द,सातत्य ठेवून दुर्गा माता शेती महिला बचत गटाने आदर्शवत कामगिरी करून दाखविली आहे.या बचत गटात बारा महिला आहेत. भामिना अमर सोनेकर या बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. गटामध्ये ललिता सहारे,उषा सोनेकर,वंदना गुळधे,वैशाली सोनुले, प्रतिभा गावतुरे,जिजा गावतुरे,संगीता दडमल,सिंधू सोनवाणे ,बेबी सोनूले कल्पना गुरनुले,वैशाली चौधरी,भाग्यश्री सचिन गुरनुले सुशीला सहदेव चौधरी,आशा अशोक सहारे,या सदस्या आहेत.महिला बचत गटातील अध्यक्ष भामिना सोनेकर यांनी महिलांना रोजगार कसा उपलब्द करायचा याचा विचार करून स्वता जवळील पैसेचा वापर करून नंतर बचत गट मधील पैसे काढून त्यांनी पळसगांव येथील बस स्थानकानजीक झुणका भाकर केंद्रातून त्यांना भाकरीची व्यवसाय सुरु केला या केंद्रात १० रुपयांत भाकर भाजी मिळते आपणही अशी सेवा लहान स्वरूपात सुरू करावी. इतर बचत गटातील महिलांना त्या माध्यमातून रोजगारही देता येईल आणि आपल्यालाही बारमाही रोजगार मिळेल, अशी संकल्पना त्यामागे होती. त्यांनी लागलीच बचत गटातील महिलांना ही संकल्पना सांगितली. यातून दुर्गा माता शेती महिला बचत गटाची स्थापना केली. दुर्गा माता शेती महिला बचत गट दहा रुपयांत एक भाजी, भाकर दिल्या जातात.आजही हीच पद्धत आहे. एक हिरवी मिरची ठेचा व लोणचे १० रुपयांत सकाळी रोज तीन भाज्या असा मेनू असतो.तीनपैकी कुठलीही एक आवडती भाजी ग्राहक घेऊ शकतो.कमी रुपयांत घरगुती जेवणाची सुविधा या गटाने उभी केल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. केंद्राच्या कामकाजाबाबत गटाच्या सदस्या सौ वैशाली सोनुले म्हणाल्या की सकाळी ७ वाजता गटाचा भाकर भाजीचे केंद्र सुरू होतो तो रात्री आठ वाजेपर्यंत चालतो. चांगला प्रतिसाद मिळत गेल्याने गटाने बचत गटातील सदस्य महिला सौ.वंदना शत्रून्य गुळधे, यांनी महिला बचत गटाला मोफत जागा उपलब्ध करून दिली.रोजगार मिळवून देणाऱ्या बचत गटांना जागा उपलब्ध करून द्यावी या कामातून सर्व महिलांना प्रतिदिन किमान २५० रुपये मिळतात. काही वेळेस एखाद्या कार्यालयातून किंवा खासगी संस्थेतून जेवणाची आॅर्डर असते. त्या वेळी अधिकचा नफा मिळतो.भाजीची गरज भासली तर ती बनवून पोचविण्याची जबाबदारी घरी कार्यरत असलेल्या महिलांवर असते.मागणीनुसार गटातील महिला लागलीच भाजी पोचविते.त्याच प्रमाणे दुर्गा माता शेती महिला बचतगटाणी वनओषधी या वस्तू सुद्धा त्या बचत गटातील महिला खरेदी करीत आहेत, मोह,बेल,टोरी,पळस फुल,बेहडा,चिंच,कवट अश्या विविध वस्तू त्या बचत गटातील महिलानि स्वता बचत गटा मार्फत खरेदी चालू केले आहे या प्रकारे त्यानी बारमाही रोजगार चालू केला आहे.



















