चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.३०.०९.१९
ब्रम्हपुरी- ओबीसी मुक्ती मोर्चा या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भात जनजागृती व विविध उपक्रम राबवल्यानंतर येनारी विधानसभा निवडणूक लढन्याचा निर्धार संघटनेने केला असून विदर्भातील चिमूर ब्रम्हपुरी व मुल या मतदारसंघात बहुजन ओबीसी आघाडी आपले उमेदवार उभे करनार असल्याची घोषणा ओबीसी मुक्ती मोर्चा संघटनेचे मुख्य संयोजक नितीन दादा चौध यानीं केली आहे.
ओबीसी वर सर्व बाजूंनी अन्याय होत असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ओबीसी मुक्ती मोर्चा या संघटनेतर्फे संपूर्ण विदर्भात जनजागृती सभा आयोजित केल्या गेल्या व या माध्यमातून संघटनेसोबत विदर्भातील ५० वेगवेगळ्या संघटना संस्था सलग्न झालेल्या असून सर्व संघटना मिळून बहुजन ओबीसी आघाडीची स्थापना करन्यात आली आहे तसेच इतर छोट्या पक्षासोबत बोलणी सुरु असून येत्या २ तारखेला उमेदवारांची घोषणा करनार असल्याचे त्यानी सांगितले.चिमूर विधानसभा मतदारसंघातुन ॲड भुपेश पाटील यानां उमेदवारी देन्याबाबत बहुजन ओबीसी आघाडी विचार करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बहुजन ओबीसी आघाडी ही निवडणूक लढतानां लोकसंख्या प्रमाणात बहुजन व ओबीसी आरक्षण, बेरोजगारांना १० हजार रुपये महागाई भत्ता,पेरणी ते कापणी ची कामे मनरेगा मजूरीतून,परंपरागत मासेमारांना सेवाकरातून सुट व रु १ फुट दराने १० वर्ष लीजवर तलावाचे अधिकार,वन्यप्राण्यामुळे झालेले शेतीनुकसान,व्यवसाय नुकसान भरपाई बोनस रुपाने देणार,
गोसीखुर्दचे पाणी शेतकऱ्यांना शेतीकरिता ताबडतोब उपलब्ध करणार,पर्यटन विकासासाठी रु १००० करोडचा आराखडा बनवणार,(चिमूर,ताडोबा, ब्रम्हपुरी)चिमुर जिल्हा म्हणून मागणी इत्यादी लोकहिताचे मुद्दे घेवून ही निवडणूक लढनार असल्याची माहिती त्यानी दिली. या घोषणेमुळे आता मतदारसंघातील निवडणूकित रंगत निर्माण झालेली आहे.



















