सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,अनिल माने
पाटण,बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातुन संपूर्ण भारत देशामध्ये एकच पर्व बहुजन सर्व हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भारत देशात परिवर्तन याञा सुरू केल्या आहेत तसेच पाटण तालुक्यातही बहुजन क्रांती मोर्चा परिवर्तन याञेच्या माध्यमातून ढेबेवाडी,मोरगिरी,नवारस्ता यांसारख्या अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या जनजागृती सभांचे आयोजन करण्यात आले असुन बहुजन क्रांती मोर्चा परिवर्तन याञेच्या आयोजनाची प्रमुख उदीष्टे
१) सामाजीक जनजागृती करून सामाजिक समस्यांची माहीती देणे.
२) बहुजन समाजातील SC/ST/BC/OBC/ मराठा मायनाॅरिटी यांच्यात एकोपा निर्माण करणे व त्यांच्या संवैधानिक अधिकारासाठी वैचारीक संघर्ष करणे.
३) OBC ची जाती आधारीत जनगणना करून लोकसंख्येप्रमानात आरक्षण मागणी.
४) EVM मशिन मधे घोटाळा होत असून जनतेच्या मतदानाच्या मौलिक अधीकाराचे हनन होत आहे.हे थांबविन्यासाठी बॅलेट पेपर द्वारे निवडनुक घेण्यासाठी EVM मशिन ला विरोध करणे.
५) SC/ST/OBC/NT/DNT यांच्यावरील अन्याय अत्याचार रोखने. या सर्व मागण्यांनसाठी दिनांक २३/११/२०१८ रोजी सर्व बहुजनांनी बहुसंख्येने उपस्थित राहुन सहकार्य करणेचे व याचा लाभ घेण्याचे आवाहन बहुजन क्रांती मोर्चा तालुका पाटण यांचे वतीने करण्यात आले आहे.



















