पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.२८.१०.१९
पिंपरी- रिक्षा चालक अत्यंत दुर्लक्षित घटक असून काही रिक्षा चालकांच्या चुकीच्या वागण्या मुळे सर्व रिक्षा चालक बदनाम जीवन जगत असून समाजाच्या रोषाचे आणि आणि आर्थिक मंदी, ओला उबेर, मुक्त रिक्षा परवाना, पेट्रोल आणि सीएनजी चे वाढलेले दर अशा विविध प्रश्न मुळे रिक्षा व्यवसाय अडचणी मधे आला आहे अशा परिस्थितीमध्ये रिक्षाचालकांची आर्थिक बिकट अवस्था असून आर्थिक अडचणीमुळे रिक्षाचालकांच्या घरात दिवाळीत दिवा जळत नसून गोड मिठाई मिळत नाही, अशा परिस्थिती मध्ये महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो रिक्षा ऑर्गनायझेशन या सामाजिक संस्था वतीने रिक्षा चालकांच्या मदतीला धावून आले असून त्यांच्या मदतीने रिक्षाचालकांची दिवाळी गोड झाली असून त्यांना दिवाळी निमित्त २०० रिक्षा चालकांना बोनस, कपडे, आणि मिठाई पिंपरी वाहतूक शाखाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील, यांच्या हस्ते वाटप करण्यात आली, यावेळी उद्योजक नितिन ठक्कर, दैलात चैधारी, पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे , सचिव प्रल्हाद कांबळे, पिंपरी विभाग अध्यक्ष इकबाल शेख, पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप साळवे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिंपरी विभागाच्या वतीने पिंपरी येथील भक्ती शक्ती हॉल मध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी रिक्षा चालकांन सोबत दिवाळी साजरी केली.
यावेळी बाबा कांबळे म्हणाले रिक्षाचालक अत्यंत दुर्लक्षित घटक असून या घटकांना दिवाळीनिमित्त कोणत्याही सुविधा मिळत नाही यामुळे पंचायत विभागाच्या वतीने एक वर्षापूर्वी रिक्षा चालक मालकांचा बचत गट स्थापन करण्यात आला होता बचत गटामध्ये रिक्षाचालकांनी मोठ्या प्रमाणात जमा केलेल्या रक्कमे मधून रिक्षाचालकांची दिवाळी गोड झाली आहे.
या उपक्रमामुळे रिक्षाचालकांच्या घरात दिवाळीनिमित्त आनंद साजर होत असून हा उपक्रम पुढील कळत पिंपरी चिंचवड शहरात सर्वत्र राबविण्यात येणार आहे असे बाबा कांबळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी दत्ता भोसले, गिरीष साबळे, साहेबराव काजळे, सदाशिव वाघमारे, अनिल कांबळे, फारुख खाण, गोविंद पवार, सुदाम रावळकर, राजू तामचिकर, विक्की भाट, यांनी परिश्रम घेतले.
पुढीलवर्षीच्या फंडासाठी दहा हजार रु.जमा झाले हि रक्कम फंड प्रमुख साहेबराव काजळे यांच्या जमा करण्यात आली.



















