पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०६.१२.२०२१
पुणे- दिनांक 6 डिसेंबर प्रतिनिधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने नव्याने आखून दिलेल्या निर्देशानुसार विविध अभिवादनपर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री श्री.धनंजय मुंडे,समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक श्री.धम्मज्योती गजभिये यांनी सकाळी चैत्यभूमीवर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. पुण्यातील बार्टी मुख्यालयामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास व पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मा.निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ओमिक्रॅान च्या वाढत्या प्रभावामुळे शासनामार्फत आखून दिलेल्या प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करून ऑनलाईन पद्धतीने “डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत २१ व्या शतकातील भारतीय सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक चळवळ”. या विषयावर संविधानाचे अभ्यासक ज्येष्ठ विचारवंत प्रोफेसर पी.आर.सोनवणे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करताना सांगितले की, महापरिनिर्वाण दिन हा समर्पण दिन असून महामानवाच्या विचाराचा प्रचार, प्रसार व संशोधन करणारी बार्टी ही संस्था असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील शोषित,वंचित,पीडित लोकांना न्याय दिला असल्याचे सांगत संविधानिक हक्क मिळवून दिले असल्याचे प्रतिपादन केले .
राज्यातील सर्व समतादुतानी आपापल्या कार्यक्षेत्रात कोवीड 19 च्या नियमाचे पालन करून महामानव विचार अभियानाद्वारे महामानवांच्या विचारांचा प्रचार व प्रसार केला.
बार्टी मुख्यालयातील प्रांगणात महामानवाला अभिवादन करण्यासाठी नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला यावेळी श्रीमती इंदिरा आस्वार,निबंधक बार्टी, पुणे श्री उमेश सोनवणे, विभाग प्रमुख बार्टी , श्रीमती वॄषाली शिंदे, विभाग प्रमुख बार्टी, श्री.शरद मडके, विधी सल्लागार, श्री नितीन सहारे, प्रकल्प व्यवस्थापक, श्री सुनील वाघमारे, श्रीमती जागृती गायकवाड, श्री रामदास लोखंडे,आदींनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनोगत व्यक्त करुन अभिवादन केले.
यावेळी बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक सुत्रसंचलन श्री. सुमेध थोरात,प्रकल्प व्यवस्थापक यांनी केले.तर आभार श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक बार्टी, पुणे यांनी मानले.



















