महाबळेश्वर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१९.०२.१९ महाबळेश्वर येथील तथागत नगर मधील समाजमंदिर येथे बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या वतीने शिवजयंती मोठया उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.यावेळी छ.शिवाजी महाराज,तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.उपस्थित शिवअनुयायांनी आपली मनोगते व्यक्त केली.याप्रसंगी बुद्धिस्ट प्रेरणाग्रुपच्या प्रदेशाध्यक्षा व माजी नगराध्यक्षा छायाताई शिंदे,गोरखनाथ शिंदे,विकास ओव्हाळ,सुमित कांबळे,श्वेता मोरे,अनिकेत मोरे,सागर कांबळे,आकाश कांबळे,अक्षय काकडे,कैलास रोकडे,ओंकार पवार,अनिता मोरे,कविता मोरे,सुनंदा रोकडे,भारती मोरे,संगीता कांबळे, यांचेसह अनेक शिवभीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















