पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.०६.१९
भोसरी- रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांना सदिच्छा देण्यासाठी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य तर्फे इत्तेहादूल अंजुमन मुस्लिमीन जमात अँड आरबी मदरसा बालाजी नगर भोसरी पुणे येथे इफ्तीयार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे, मौलाना इनायत करीम, समाजसेवक नसीर शेख, जावेद शहा,सालार शेख,रशीद शेख,साजिद शहा,चांद शेख,सादिक शेख,शहारुख शहा,समीर रमजान शेख,निर्भिड पत्रकारचे संपादक नंदकुमार जोगदंड, कलिंदर शेख,विकास ओव्हाळ,राष्ट्रपाल मेश्राम,अमर सुर्यवंशी, विनोद जोगदंड, सचिन कांबळे,दिलीप देहाडे,रवी गायकवाड,सचिन कांबळे यांचेसह बहुसंख्य मुस्लिम बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये रमजानच्या सदिच्छा देन्यासाठी आपण एकत्रित आलो आहोत. आपण सर्वजण भारतीय आहोत आणि सर्वजण बांधव आहोत ही भावना समाजात दृढ व्हावी हा विचार सर्वांनी मनामध्ये ठेऊन मार्गक्रमण केल्यास भारताला महासत्ता बानण्यापासून कोणीच रोखू शकत नाही असे विचार किरण शिंदे यांनी या प्रसंगी व्यक्त केले असून सर्व बांधवांना रमजानच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



















