महाबळेश्वर : (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी – दि.९जुलै २०१८ रोजी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य महाबळेश्वर शाखेच्या वतीने तसेच बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्ये या संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा आदरणीय छायाताई शिंदे यांच्या अधिपत्याखाली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे सर यांच्या मार्गदर्शना खाली १० वी तसेच१२ वी वर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुणगौरव सत्कार करण्यात आला प्रत्येकाला एक वही आणि एक पेन एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला इथून मागे कधी ही न केलेला उपक्रम बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप ने केला विद्यार्थ्यामध्ये एक नवीन प्रेरणा एक नवीन उत्साह पुढील शिक्षणाबद्दल एक नवीन चेतना निर्माण करणारा हा उपक्रम ठरला ,आलेल्या सर्व पाहुण्यांचा व ज्यांनी या कार्यक्रमास मदत केली त्यांचे सत्कार करण्यात आले. विशेषता साक्षरता प्रौढ वर्गातील महिलांना आपला अमूल्य वेळ देऊन शिकवण्याचे काम श्वेता मोरे यांनी केले त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये आदरणीय छायाताई शिंदे यांनी विद्यार्थ्याना तसेच प्रौढ साक्षरता वर्गाला शिक्षणाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले वारुणकर मॅडम ने ही थोडक्यात शिक्षणाचे महत्व पटवून दिले त्या नंतर बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य जिल्हा अध्यक्ष प्रशांत मोरे यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले तसेच बाबासाहेबानी दिलेला २२ प्रतिज्ञाचे महत्व, १ जानेवारी भिमाकोरेगाव चा इतिहास व विद्यार्थ्याना शिक्षणाचे महत्त्व थोडक्यात पटवून सांगितले व त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या . तालुका अध्यक्ष सुमितजी कांबळे यांनी या कार्यक्रमास विशेष मदत केली महाबळेश्वर नागरपालिकेतील मुकादम मनोज चव्हाण यांनी ही थोडक्यात मागरदर्शन केले . या कार्यक्रमास छायाताई शिंदे,प्रशांतमोरे,सुमित कांबळे,मनोज चव्हाण,अनिकेत मोरे,आकाश कांबळे,दशरथ कांबळे,वारुणकार मॅडम,श्वेता मोरे,रंजना कांबळे,शीतल कांबळे,श्रीदेवी कसबे,सुनंदा रोकडे,कैलाश रोकडे,वने मॅडम,सुरेखा कांबळे,संगीता कांबळे,अजय कांबळे,सुजाता मोरे,मोरे बाई,खरे बाई,सर्व महिला बचत गट साक्षरता प्रौढ वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.



















