सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.१२.०१०.१९
फलटण- सातारा गुन्हे शाखेच्या पथकाने वाढे फाटा येथून एकास बेकायदा गावठी पिस्टल सह ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांना मिळालेल्या बातमीनुसार, एक इसम वाढे फाटा सातारा परिसरात गावठी बनावटीचे पिस्टल घेऊन संशयितरित्या फिरत असल्याचे कळाले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुस, रोख रक्कम असा एकूण ८५३८०/-ऐवज त्याच्याकडून जप्त केला आहे.



















