पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२७.०५.१९
पिंपरी- पि.चि.महानगर पालिकेच्या हद्दीतील बेकायदेशीर बांधकामे जोमात सुरू आहेत.या लोकांना प्रशासनातील बांधकाम परवानगी विभागातील मुजोर अधिकारी-कर्मचारी बेकायदेशीर बांधकामाना मुकसमर्थन देत असल्याने या लोकांना कसलीच भीती राहिली नाही,अधिकारी फक्त नोटीस बजावतात चौकशी केल्यास उडवा-उडवीची उत्तरे देत,बंदोबस्त मिळाला नाही असे करणे देत वेळ काढू पणा करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना कडक शासन व्हावे, बेकायदेशीर कामांमध्ये हलगर्जीपणा दाखवणर्या अधिकार्या वरती कडक कारवाई करण्यात यावी,नॅशनल ब्लॅक पॅंथर पुणे मेहबूब शेख,डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे दीपक खैरनार,सतीश कदम लोकजनशक्ती पार्टी पुणे विनोद भालेराव,समाजसेवक अजय हनुमंत लोंढे,समाजसेविक लक्ष्मी शेलार,सविता लखन,लक्ष्मी लिंबोळे,विनोद भिसे,भारत मीरपगारे,नॅशनल ब्लॅक पॅंथरच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा संगीता परेश शहा, यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
पि.चि. महापालिका हद्दीतील अनाधिकृत बांधकाम, पत्राशेड धारकांवर आणि बांधकामात दोषी व कर्तव्यात कसूर करणा-या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी असे दिलेल्या निवेदनांत म्हटले आहे.



















