सोलापूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,प्रविण वाघमारे
दि.२४.१०.१९
माळशिरस- विधान सभा २५४ माळशिरस मतदार संघातून भाजपा व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचा विजय झाला आहे. राम सातपुते हे २५९० एवढ्या लीडने माळशिरस मतदार संघातून निवडून आले आहेत,एकुण २१५३१३ मतदान झाले. माळशिरस मतदार संघा मधे अतिशय चुरशी ची लडाई झाली, मतदारांची उत्कंठा शिगेला लागली होती. कोण बाजी मारेल, भाजपा राम सातपुते -१०३५०७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्तमराव जानकर -१००९१७, वंचित बहुजन आघाडी राज कुमार -५५३८, नोटा -१८९९, बीपीएस पी अशोकराव तडवळकर -सर -६९५, बिएसपी श्रीकृष्ण प्रक्षाळे -१०८१, अपक्ष उत्तम मोठे -५३४, अपक्ष -मकरंद साठे -६८२, अपक्ष बापूराव अहिवळे -३९०.राम सातपुते यांच्या विजयाने भाजपा व महायुतीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून विजय आनंद साजरा केला. मतदान प्रशासकीय विभागाने अंतिम निकाल जाहीर केल्या नंतर कार्यकर्त्याने एकच जल्लोष केला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.



















