नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,शांताराम दुनबळे
दि.२६.११.१९
निफाड- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस अहोरात्र झटुन भारतीय संविधान निर्माण केले आणि २६ नोव्हेंबर दिनी हे संविधान या स्वतंत्र भारत देशाला “दान” म्हणुन बहाल केले त्यास आज पुर्ण पणे ७० वर्ष पुर्ण झाले आहे यानिमित्ताने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निफाड शहरातील पुर्णाकृती स्मारकास अभिवादन करुन निफाड तालुक्यातील चांदोरी गावातील न्य इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थीयांना शालेय वस्तुंचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भारतीय मानवाधिकार परिषद नाशिक जिल्हाअध्यक्ष मा.राहुल बॉक्सर, निफाड तालुका अध्यक्ष मा.सचिन हिरे, भारतीय मानवाधिकार परिषदेचे नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष मा.सोमनाथ गायकवाड, निफाड तालुका महासचिव मा.गणेश गांगुर्डे, न्यु इंग्लिश स्कुल चे प्राचार्य मा.चौरे सर, उपप्राचार्य मा.त्र्यंबकेसर, निफाड तालुका कार्यकारणी सदस्य राहुल उन्हवने, आकाश शेटे आदींसह न्यु इंग्लिश स्कुलचे कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी भारतीय मानवाधिकार परिषद यांचे वतीने मा.सोमनाथ गायकवाड यांनी भारतीय संविधानाबद्दल सर्व विद्यार्थीयांना मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते शालेयवस्तुंचे वाटप करण्यात आले.



















