चंद्रपुर(निर्भीड न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
चिमूर,चिमूर तालुक्यातुन भिसी हे नुकतीच भिसी अप्पर तालुक्यात समावीष्ठ झाले असून भिसी येथे समाविस्त गाव भिसी,शंकरपुर, जांभुळघाट या गावांमधील विवीध वृत्तपत्रात काम करणाऱ्या प्रतीनीधी, वार्ताहरांची बैठक घेण्यात आली. पत्रकारांवर होणारे अन्याय, त्यांच्यावरील होणारे हल्ले, तसेच पत्रकारांना सामाजीक क्षेत्रात कार्य करतांना निर्माण होणाऱ्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी, त्याचे निवारण करण्याच्या उद्येशाने भिसी अप्पर तालूका कार्यकारिणीचे गठण करण्यात आले. यावेळी भिसी,शंकरपुर व जांभुळघाट चे पत्रकार उपस्थीत होते.
शंकरपुर येथील जेष्ठ पत्रकार सुभाष खानोरकर यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आलेल्या बैठकीत भिसी येथील पत्रकार पंकज मिश्रा यांची बहुमताने अध्यक्षपदासाठी निवळ करण्यात आली. सचीव पदासाठी शंकरपुर येथील शेषराव राऊत, उपाध्यक्ष म्हणून जांभुळघाट येथील झामदेव आत्राम, सहसचीव पदावर भिसी येथील दिपक आडकिने तसेच शंकरपुर येथील जगदीश पेंदाम यांची कोषाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.
यावेळी भिसी येथील पत्रकार मनोज डोंगरे, सारंग भिमटे, अनील रेवतकर, रविन्द्र गोंगले, पंकज मिश्रा, दिपक आडकीने, उमेश बोमेवार,शंकरपुर येथील सुभाष खानोरकर, सुनील कोडापे, शेषराव राऊत,जगदीश पेंदाम,अमोद गौरकर,संतोश कोरडे,तसेच जांभुळघाट येथील पत्रकार झामदेव आत्राम प्रामुख्याने उपस्थित होते.



















