पुणे, दिनांक २२/०४/२०१८ भीम कोरेगाव या वर्षीच्या सुरवातीला जातीयवादी मानसिकतेच्या समुहाकडून घडलेल्या हल्ल्या मधे दिनांक ०२/०१/२०१८रोजी सुरेश सकट यांचे घर काही जातिवादी समाजकंटकांनी जाळले होते.त्यांची मुलगी पुजा ही दिनांक २०/०४/२०१८ बेपत्ता होती. तिचा शोधाशोध केल्यावर तिचा मृत्यदेेह विहारीमध्ये आढळून आला. हा संशयास्पद आहे. तिची हत्या करण्यात आली आहे. त्याची योग्य ती चौकशी करण्यात यावी अशी मागणी पुजाचे नातलग व आंबेडकरी चळवळीने लावून धरली. जो पर्यन्त दोषिंना अटक होत नाही तो पर्यन्त पुजाचा मृत्यदेह स्विकारणार नाही अशी भूमिका पुजाचे नातलग व आंबेडकरी चळवळीने घेतली. पूजाला न्याय मिळाला पाहिजे,दोषिंना त्वरित अटक करा,जबाबदार पोलिसांवर गुन्हे दाखल करा अशा घोषणांनी ससून हॉस्पिटल परिसर हादरुन गेला होता. या बाबतची माहिती अशी भिमा कोरेगाव मधील पी. डब्ल्यु. डी. च्या जागेवर गेले १५ वर्षापासून सकट कुटुंब राहत असून त्यांच्या बाजूच्या प्लॉट मालकास त्यांची आडकाठी होत असल्याने त्यांचे कडून अनेकदा त्यांना धमकवण्याचे प्रकार झाले आहेत. त्यांना बळजबरीने घर खाली करण्यास दबाव आणला जात आहे. दरम्यान दि.१ जानेवारीला दंगलीचा भडका भीमा कोरेगाव येथे उडाला व या मालकाने डाव साधून दि.२तारखेस सकट यांचे घर जाळले. या बाबतीत वेळोवेळी ४ वेळा पोलिस तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर कोणतीही कारवाही अद्याप करण्यात आली नाही. त्या धनदांडग्यांना पोलिस अधिकारी संरक्षण देत असल्याने आज ही घटना घडली असून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल व्हायला हवेत अशी मागणी मृत पुजाचा भाऊ जयदिप याने केली आहे. २/०१/१८ रोजी दाखल झालेल्या दाखल फिर्यादीमधे नवनाथ दरेकर, सोमनाथ दरेकर, गोरक्ष थोरात, गणेश थोरात, विशाल दरेकर व १०० ते १५०लोकांचा उल्लेख करण्यात आला आहे.१३/११/१७ रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक यांना पत्राने या प्रकरणी सुरेश सकट यांनी कळविले आहे. घटनेची माहिती समजताच शहरातील विविध आंबेडकरी संघटनेचे कार्यकर्ते ससून डेड हाऊस येथे जमा झाले.पुजाच्या हत्याऱ्यांला शिक्षा झालीच पाहिजे, गुन्हेगारांना मदत करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर हादरून गेला होता. या वेळी उपमहापौर डॉ.शिद्धार्थ धेंडे, वसंत साळवे, बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे अध्यक्ष किरण शिंदे, धनंजय सोनवणे, संजय भिमाले, शाम गायकवाड, संदीप जोगदंड, विकास ओव्हाळ, अजय शिंदे, नंदकुमार जोगदंड, रामदास लोखंडे, यांच्या सह शेकडो कार्यकर्ते सामील झाले होते.



















