पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.१३.०६.१९
◆ महावितरणच्या अधिकाऱ्यांना आ. महेश लांडगे यांचा आढावा बैठकी दरम्यान इशारा
पिंपरी- पावसाळ्याच्या तोंडावर भोसरी मतदार संघातील विविध परिसरामध्ये सर्वाधिक समस्या या सातत्याने आणि अधिक कालावधीकरीता वीजपुरवठा खंडीत झाल्याच्या आहेत. अनेक तास वीज खंडीत झाल्याने नागरीक हैराण झाले आहेत. त्यासोबत औद्योगिक पट्ट्यातील वीजपुरवठा खंडीत होत असल्याने लघुउद्योजकांना कोट्यावधी रूपयांचे नुकसना होत आहे. त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. यापुढे औद्योगिक पट्ट्यात एक तासही वीजखंडीत न होण्याची दक्षता घ्यावी. तसेच येत्या दोन दिवसांत समस्यांचे निराकारण न झाल्यास भोसरीतील बालाजीनगर येथील महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकु असा इशारा भोसरी मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना बैठकीमध्ये दिला. त्यासोबतच माझ्या मतदारसंघातील नागरिकांना अंधारात ठेवुन मोईतील क्रशर मशीनचा वीजपुरवठा तातडीने खंडीत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. नागरिकांच्या समस्यांसाठी आमदारांचा रूद्रावतार पाहिल्यानंतर महावितरणचे अधिकारीही घामाघुम झाले होते.



















