कराड (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी : सूरज जाधव
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सकल मराठा समाजाकडुन सरकार कडे वारंवार मागणी होत आहे. परंतु अशा मागण्यांची सरकारने काहिच दखल घेतली नाही.गेल्या चार दिवसांपासून परळी येथे सकल मराठा समाज ठिय्या आंदोलन करत आहे. तसेच मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यभर वेगवेगळी आंदोलने होत आहेत. याची दखल सरकारने न घेतल्याने मराठा क्रांती मोर्चा कराड तालुका यांचा पाठिंबा म्हणून कायदेशीर मार्गान दि.२४ जुलै रोजी तहसिलदार कार्यालय कराड येथे ठिया आंदोलन करणार आहे आशा आशयाचे पत्र तहसीलदार यांना कराड तालुका सकल मराठा समाज यांच्या वतीने दि.२१रोजी देण्यात आले.



















