महाबळेश्वर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०९.०३.१९
महाबळेश्वर येथील तथागत नगर मधील समाज मंदिरामध्ये बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप या सामाजिक संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्स्फुर्तपणे साजरा करण्यात आला.यावेळी महिलांनी पारंपरिक वेषभूषा करून सावित्रीमाई फुले,झाशीची राणी व इतर अनेक महान स्त्रियांच्या स्मृती जागृत केल्या.यावेळी काहींनी मनोगते सादर केली तर काहींनी एकपात्री चरित्रे साकारली.आजच्या दिवसाचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता हा आनंद त्यांनी नृत्य व फुगडी इ.खेळ खेळून साजरा केला. सर्वात शेवटी सामूहिक अल्पोपहाराचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीन पन्हाळकर व श्वेता मोरे यांनी केले. जेष्ठ समाजसेविका छायाताई शिंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.सुमित कांबळे,अनिकेत मोरे,नयन वने,सागर कांबळे,आकाश कांबळे यांचे सहकार्य कार्यक्रमास लाभले. शेकडो महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



















