पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि२३.०७.१९
भोसरी- माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून, खेळाडूंना स्पोर्ट्स किट वाटप करण्यात आले. वाढदिवसानिमित्त संजय वाबळे प्रतिष्ठान, भोसरी यांच्यावतीने प्रभाग क्र. ८ ,पेठ क्र. १० व १२ मधील मुख्य रस्ता -दुभाजक या ठिकाणी ७५ बकुळीचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच संजय वाबळे स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर या ठिकाणी सराव करणाऱ्या जिल्हास्तरीय २५ स्थानिक कबड्डी खेळाडूंना स्पोटर्स किटचे वाटप माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेवक व शहर सुधारणा समितीचे सदस्य संजय वाबळे व प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व विद्यार्थी संघटना पिंपरी चिंचवड शहर व प्रभाग क्र. ८ चे आजी -माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासमवेत उद्यान विभागाचे अधिकारी एस.डी. रावते व कर्मचारी वर्ग, स्थानिक रहिवाशी नागरिक व उद्योजक बहुसंखेने उपस्थित होते.



















