सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२९.०९.१९
◆ सुमारे ३५ हजार रुपये किंमतीची दारु जप्त
खटाव- कलेढोण येथे एसटी स्टॅन्ड परिसरात माजी सरपंचाचा बेकायदेशीर दारु अड्डा सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाला (एलसीबी) मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकून तो अड्डा उध्वस्त केला. या घटनेत सुमारे ३५ हजार रुपये किंमतीची दारु जप्त करण्यात आली आहेे.गजानन लक्ष्मण बुधावले (वय ४१) रा.कलेढोण असे अटक केलेल्याचे नाव असून त्याचा साथीदार माजी सरपंच शंकर चव्हाण हा पसार झाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरासह जिल्ह्यात गैरप्रकार सुरु असल्याने त्यावर प्रतिबंध ठेवण्यासाठी पोलिस प्रयत्नशील झाले आहेत. कलेढोण येथे बेकायदेशीर दारु अड्डा सुरु असल्याचे एलसीबीला समजल्यानंतर त्यांनी पोलिसांचे एक पथक तयार केले. दि. 28 रोजी पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता त्याठिकाणी देशी व विदेशी दारुच्या बाटल्या पोलिसांच्या निदर्शनास आल्या. यावेळी गजानन बुधावले याला पोलिसांनी ताब्यात घेतले तर माजी सरपंच शंकर चव्हाण हा तेथून पसार झाला.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर त्याठिकाणी सुमारे ६ बॉक्स दारुच्या बाटल्या होत्या. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला.दरम्यान कलेढोणमधे माजी सरपंचाच्या दारु अड्डयावर छापा पडल्याचे समोर येताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.पोलिसांनी सर्व मुद्देमाल वडूज पोलिस ठाण्यात नेवून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. पो.नि.विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे,ज्योतीराम बर्गे, प्रविण शिंदे,विनोद गायकवाड,मोहन नाचण,संतोष जाधव,प्रविण कडव,गणेश कापरे,धिरज महाडीक,वैभव सावंत,केतन शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला,



















