सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३.०१०.१९
सोलापूर- माळशिरस विधानसभा निवडणुकीस वेगळे राजकीय वळण मिळाले असून तालुक्यातील भाजपचे नेते आणि पारंपरिक मोहिते पाटील विरोधक उत्तम जानकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आहे.या नाट्यमय घडामोडींमुळे माळशिरस विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवार यादीत गुरुवारी उत्तमराव जानकर यांना माळशिरस मधून उमेदवारी दिल्याचे स्पष्ट झाले.या उमेदवारीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण बदलले आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा अनुसुचीत जातीसाठी राखीव आहे.या मतदारसंघातून यापूर्वी दोन वेळा राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. परंतु मोहिते पाटील गटाने लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपत प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलत गेली.व मोहीते पाटील गट व जानकर गटाने भाजपाचे एकत्रित काम केल्याने म्हाडा लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांना १ लाखाचे मताधिक्य्य तालुक्यातून मिळालेआहे.त्यानंतर भाजपचे नेते उत्तमराव जानकर यांचा खाटीक धनगर हा जातीचा दाखला उच्च न्यायालयाने वैध ठरविला.त्यामुळे उत्तमराव जानकर हेच भाजपाचे उमेदवार असतील असे संकेत मिळत होते. परंतु भाजपने त्यांना फलटण राखीव मतदारसंघात लढण्याचे आवाहन केल्याचे समजते.सोलापूर- माळशिरस विधानसभा निवडणुकीस वेगळे राजकीय वळण मिळाले असून तालुक्यातील भाजपचे नेते आणि पारंपरिक मोहिते पाटील विरोधक उत्तम जानकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आहे.या नाट्यमय घडामोडींमुळे माळशिरस विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवार यादीत गुरुवारी उत्तमराव जानकर यांना माळशिरस मधून उमेदवारी दिल्याचे स्पष्ट झाले.या उमेदवारीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण बदलले आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा अनुसुचीत जातीसाठी राखीव आहे.या मतदारसंघातून यापूर्वी दोन वेळा राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. परंतु मोहिते पाटील गटाने लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपत प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलत गेली.व मोहीते पाटील गट व जानकर गटाने भाजपाचे एकत्रित काम केल्याने म्हाडा लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांना १ लाखाचे मताधिक्य्य तालुक्यातून मिळालेआहे.त्यानंतर भाजपचे नेते उत्तमराव जानकर यांचा खाटीक धनगर हा जातीचा दाखला उच्च न्यायालयाने वैध ठरविला.त्यामुळे उत्तमराव जानकर हेच भाजपाचे उमेदवार असतील असे संकेत मिळत होते. परंतु भाजपने त्यांना फलटण राखीव मतदारसंघात लढण्याचे आवाहन केल्याचे समजते.



















