सोलापूर(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि,२.१२.२०१९
माळशिरस- गोरडवाडी ता.माळशिरस जिल्हा सोलापूर येथिल युवक नवनाथ भगवान कोळेकर वय २७ शिक्षण १२वी त्यांना दोन भाऊ होते त्यातला एक भाऊ बैलगाडी खाली गाऊन वारला आणि दुसरा भाऊ करंट लागून वारला त्यामुळे त्यांच्यात चार-पाच वर्ष दुःखच दुःख होते तीन नंबरचा भाऊ म्हणजे नवनाथ भगवान कोळेकर त्यांना पण किडनीचा आजार झाला ती आता सध्या डायलिसिंग वर आहेत त्यांना बालपणापासून मुतखड्याचा आजार आहे त्यानंतर बारावी तुन त्यांनी शाळा सोडली कारण आर्थिक परिस्थिती नव्हती शाळा सोडल्यानंतर चार-पाच वर्षांनी त्यांना किडनीचा आजार झाला साधारण २०१६ साली त्यांना आजार झाला त्यांचं स्टेटमेंट आतापर्यंत देवडीकर हॉस्पिटल अकलूज मध्ये आहे दवाखान्याचा खर्च भरपूर व्हायला लागला आणि त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती ऑपरेशन करण्यासाठी पैसे नव्हते म्हणून त्यांनी इस्लामपूर मधील त्यांची बागायत ३ एकर जमीन विकली आणि त्यांच्या वडिलांनी त्यांची स्वतःची किडनी पोराला दिली आणि ऑपरेशन केले ऑपरेशनचा खर्च साधारण १५ ते १६ लाख रुपये आला त्यांचं ऑपरेशन बिर्ला हॉस्पिटल चिंचवड मध्ये करण्यात आले पण तरीसुद्धा काही दिवसांनी आदुगर सारखं किडनीचा आजार त्यांना जानू लागला म्हणजे ती किडनी त्यांना मॅच झाली नाही फेल गेली पण त्यांनी अजूनही धीर सोडला नाही त्यांचा डायलिसिंगचा दर आठवड्याचा खर्च दोन ते अडीच हजार आहे पण डॉक्टरांचं म्हणणं आहे डायलिसिंग वर खर्च करण्यापेक्षा किडनी ट्रान्सफर करा म्हणून दुसरी किडनी त्यांची आई देणार आहे पण ऑपरेशन करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नाहीत त्यामुळे त्यांना सर्वांनी मदत करावी ते आत्ता सध्या डायलिसिंगचा आठवड्याचा खर्च ते गावा मधून वर्गणी काढून आत्ता दवाखान्याचा खर्च भागवतात त्यांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे तरी त्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी असे आवाहन त्यांनी जनतेस केलेले आहे



















