सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,प्रविण वाघमारे
दि.२२.१०.१९
माळशिरस- २१ ऑक्टोबर रोजी २५४ माळशिरस विधानसभा मतदार संघातून १ लाख ९७ हजार ६९ मतदारांनी आपले मतदान केले एकूण ६१.५४ टक्के मतदान झाले आहे. यावेळी तरुण मतदारांचा टक्का जास्त प्रमाणात दिसून आला. मतदान कक्षेत नेमलेले अधिकारी प्रत्येक बूथ वरील नेमलेले वर्ग यांनी ही पूर्ण दक्षता घेतलेले दिसून आले. पोलीस यंत्रणा ही शिस्तबद्ध होती. मतदान हे शांततेत पार पडले.



















