पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिकेत जगताप
दि.२.१०.१९
मावळ- विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला आता सुरवात झाली आहे. जवळजवळ सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने मावळ मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांना उमेदवारी दिली आहे.बाळा भेगडे गुरुवारी दि.३ आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी भव्य रॅली देखील काढणार आहेत. यासाठी बाळा भेगडे यांनी मावळ मतदारसंघातील नागरिकांना अर्ज भरतेवेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.वडगाव मावळ येथे हा भेगडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता हनुमान मंदिर वडगाव फाटा येथे सर्व कार्यकर्ते एकत्र येणार असून बाळा भेगडे यांच्या बरोबर उमेदवारी अर्ज भरावयास जाणार आहेत.
बाळा भेगडे हे मावळ विधानसभा मतदारसंघातून आतापर्यंत दोन वेळा निवडून आले आहेत. तसेच त्यांनी फडणवीस सरकारच्या अखेरच्या वर्षात मंत्रीपदही भूषवले आहे. शिवाय बाळा भेगडे यांचे मावळ विधानसभा मतदारसंघात चांगलेच वर्चस्व आहे. बाळा भेगडे यांनी कार्यकर्त्यांचा विजयी संकल्प मेळावा आयोजित केला होता. यावेळी विरोधी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे दिवसेंदिवस बाळा भेगडे यांचे मतदारसंघातील वर्चस्व घट्ट होत असल्याचे दिसत आहे.



















