पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, कलिंदर शेख
दि.०९.०५.१९
पिंपरी,चिंचवड- वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय नेते,बहुजन हृदयसम्राट,स्वाभिमानी नेते, आदरणीय मा. अँड.बाळासाहेब आंबेडकर आणि MIM पक्षाचे राष्ट्रीय मा.अध्यक्ष.असददुद्दीन ओवेसीसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर महासचिव रूहिनाझ शेख यांच्या वतीने रक्तदान शिबिर अयोजित करण्यात आले होते.या शिबिरास प्रमुख उपस्थितीत मा.धम्मराज साळवे MIM प्रवक्ता पश्चिम महाराष्ट्र, मा. देवेंद्र तायडे (पि. चि. शहराध्यक्ष भारिप), यांच्यासह अनेक कार्यकर्ते,नागरिकांनी,रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



















