चंद्रपूर(निर्भीड न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०९.०५.१९
मा.अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक ८/५/२०१९ ला सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर तर्फे बाळासाहेब आंबेडकर यांचा ६५ वा वाढदिवसा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त परिस्तिथी असल्यामुळे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष.अँड.बाळासाहेब आंबेडकर यांनी कार्यकर्ते याना केले व तसेच आपल्या सर्व कार्यकर्त्याना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लागेल ती मदत करण्याचे आवाहन केले आहे.



















