बीड(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०५.१९
गेवराई, भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा वंचीत बहुजन आघाडीचे संस्थापक मा.प्रकाश आंबेडकर आणि एआईएमआईएम चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.बॅ.असदुद्दीन ओवेसी साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त उपजिल्हा रुग्णालय येथे गोरगरीब रुग्णांना फळ वाटप तसेच बालग्राम सहारा अनाथालय येथील अनाथांना फराळ वाटप करुन वंचीतांना सत्तेचा राजमार्ग दाखवनारे व न्याय हक्क मिळवुन देणाऱ्या सर्व जाती,धर्मांना एकञ आणनाऱ्या दोन्ही नेत्यांचा अत्यंत उत्साहात वाढदिवस साजरा केला.दुष्काळी परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी पाणी वाटप करण्यातआलेआहे.यावेळी शेख निजाम,अजिंक्य चांदने,बबनराव वडमारे,संतोष जोगदंड,पप्पु गायकवाड,सुभान भाई सय्यद,बंटी सौंदर्मल,एॅड.सोमेश्वर कारके,ज्ञानेश्वर हवाले,अमोल सुतार,अनिल तुरुकमारे,मुजीब मौलाना,प्रदिप तुरुकमारे,एॅड.अमोल कोल्हे,कैलास ढोले,नाना भिसे तसेच वंचीत बहुजन आघाडीचे सर्व घटक पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थीतीत फळांची व फराळाची वाटप करण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन वंचीत बहुजन आघाडी,भारीप, एआयएमआयएम,डीपीआय,महाराष्ट्र विकास आघाडी यांच्या सर्व ता.अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी केले होते.



















