मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, दि.१८.०१.२०२०
मुंबई- रविवारी आयोजित केलेल्या मुंबई मॅरेथॉन २०२० मधे धावताना हृदयविकाराच्या झटक्याने एका ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गजानन मालजलकर असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. गजानन यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत झाल्याचं घोषित केलं.
मॅरेथॉनमधे धावण्याच्या वेळी इतर दोन धावपट्टूंना हृदयविकाराचा झटका आला. पण त्यापैकी एकाला रुग्णालयात दाखल केले आहे तर दुसर्याला व्यक्तीचा डिस्चार्ज झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. यामधे गजानन मालजलकर यांचा मृत्यू झाला आहे.
कडाक्याच्या थंडीत मुंबई १७ व्या टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी ५.१५ वाजता सुरुवात झाली होती. या स्पर्धेत देश-विदेशातील एकूण ५५ हजार ३२२ धावपटू सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ते वरळी डेअरी इथून अर्धमॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत गुलाबी थंडीत धावण्यासाठी मुंबईकरांनीही मोठा उत्साह दाखवला.



















