पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०१.०९.२०२०
पुणे- इंदिरा नगर अपर विभागामध्ये युवा नवोदित उद्योजक रघुनाथ कदम यांच्या मालकीचे “मेत्ता फूड्स”च्या सेल्स काऊंटरचा बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक किरण शिंदे यांच्या हस्ते रिबीन कापून प्रारंभ करण्यात आला.या सेल्स काउंटरच्या माध्यमातून रघुनाथ कदम हे दर्जेदार तेलबिया वापरून पारंपरिक पद्धतीने घाण्यावर पिळून तयार केलेले कोणत्याही रासायनिक प्रक्रियेविना व अगदी नॉर्मल तापमानात तयार केलेले मानवी शरीरास व आरोग्यासाठी लाभदायक असे खाद्य तेलाची विक्री करणार आहेत.अशी माहिती मेत्ता फूड्सचे संचालक रघुनाथ कदम यांनी निर्भीड पत्रकारशी बोलताना दिली.तर समाजातील जास्तीत जास्त युवकांनी नोकरीच्या पाठीमागे न धावता नवनवीन संकल्पना वापरून नाविन्यपूर्ण असे उद्योग उभारून उद्योजक बनायला हवे त्यासाठी संघटनेची उद्योजक आघाडी मार्गदर्शन उपलब्ध करून देईल याची ग्वाही बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप या राज्यव्यापी सामाजिक व धार्मिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी यावेळी दिली तर रघुनाथ कदम यांचा आदर्श घेऊन तरुणांनी उद्योग व्यवसाय उभारणीस प्रारंभ करावा त्यामुळे आपण स्वतः पर्यायाने समाज व देशाची प्रगती झाल्यावाचून राहणार नाही अशी आशा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. या कार्यक्रमास संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित माने,सुमित गायकवाड,पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष विकास ओव्हाळ,केतन जगताप, कुणाल जगताप, हिरा दलालकर, शिलरत्न दिपंकर,दादा साळवे, रवींद्र गायकवाड, संजीत खारवे,अनिल पठारे,अशोक बल्लाळ, पंचशीला कुडवे यांचेसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले व अतिशय मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम पार पडला. उपस्थित सर्वांनी कदम परिवाराचे अभिनंदन केले आहे.तर येत्या काळात अनेक उद्योजक घडविण्याचे संघटनेचे ध्येय असल्याचे जिल्हाध्यक्ष अमित माने यांनी म्हटले आहे.



















