मौजे पिंपळगाव (कवरवाडी) येथे श्री.वडजाई मंदीर परिसरात वृक्षारोपन उत्साहात
सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिल माने
दि.२३.०७.१९
पाटण- मौजे पिंपळगाव (कवरवाडी) येथे श्री.वडजाई मंदीर परिसर या ठिकाणी शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यकारी सरकारी सेवा सोसयटी लि.मुळगाव यांचेकडून ५० वृक्षांची झाडे लावण्यात आली.या वेळेस संस्थेचे चेअरमन श्री.कुंडलीक कवर, राजाराम कवर, सीताराम कवर, रघुनाथ कवर व सर्व संचालक तसेच ग्रामविकास मंडळ कवरवाडी अध्यक्ष श्री.गणेश कवर सदस्य ग्रामविकास मंडळ मुंबई श्री.सीताराम कवर, पोलीस पाटील श्री.राजेंद्र कवर, शिवगर्जना प्रतिष्ठान फ्रेन्डस् सर्कल, ओम साई तरुण मंडळ, गणेश मंडळ, दुध संस्थेचे चेअरमन सर्व सदस्य ग्रामस्थ श्री.बंडू सुतार, संपत कवर, दत्तात्रय कवर, उत्तम कवर, दिनेश कवर, विष्णू कवर, सीतारामन सुतार, चंद्रकांत सुतार, दशरथ कवर, सुनिल कवर, अमर कवर, मंगेश पवार, सखाराम कवर, श्रीकांत कवर, लक्ष्मण कवर, वडजाई देवी पुजारी श्री.सुनिल कवर व जि.प.शाळा कवरवाडी बालचमू व गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
◆ विशेषत- या गावचे सुपुत्र श्री.जयवंत कवर वनपाल अधिकारी रासाटी यांनी झाडे उपलब्ध करून देण्यास सहकार्य केेले.अशाच प्रतीच सहकार्य झाडे जागवण्यासंदर्भात करावे अशी आशा मा.जयवंत कवर यांनी व्यक्त केली.



















