पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०५.१०.१९
पिंपरी- सकल मातंग समाज आणि बारा बलुतेदार समाज यांच्या वतीने युवराज दाखले यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दि. ४ रोजी दाखल केला. दाखले यांना अनेक संघटनेचा आणि बाराबलुतेदार बांधवांचा पाठींबा आहे.सकल मातंग समाज आणि बारा बलुतेदार समाजाच्या वतीने शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.निगडी येथील डॉ.हेडगेवार भवन येथे निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इदानी यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला. यावेळी शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत उपस्थित होते.



















