बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,अमोल पवार
दि.०५.०७.१९
आष्टी- कडा शहरातील ६० लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्ते कामांचा युवा नेते जयदत्त धस यांच्या हस्ते आज शुभारंभ झाला. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत आ. सुरेश धस यांनी कड्यातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणार असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते ते आश्वासने त्यांनी आमदार होताच पूर्ण करण्यास सुरुवात केली असून २५-१५ या हेडमधून शहराच्या विकासासाठी ६० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला असून आज सर्व कामांचा शुभारंभ युवा नेते जयदत्त धस यांच्या हस्ते पार पडला. कडा शहरातील सर्व अंतर्गत रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे होणार असून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सिमेंट नाल्या तयार करण्यात येणार आहेत.
★नव्याने होणारे सिमेंट रस्ते★
◆ गढीयेथील पांडुरंग देशमुख यांचे घर ते कांता देशमुख यांचे
घर सिमेंट रस्ता.
◆ गौतम क्लाथ ते डॉ.कर्डिले
हॉस्पिटल सिमेंट रस्ता.
◆ गढीचा दरवाजा ते रविंद्र
पांडुरंग देशमुख यांचे घर
सिमेंट रस्ता कानिफनाथ चौक
ते पाटील गल्ली सिमेंट रस्ता.
◆ छगन कर्डिले यांचे घर ते
गावडे किराणा सिमेंट रस्ता.
◆ छगन कर्डिले यांचे घर ते
गावडे किराणा दुकान नाली
बांधकाम करणे.
◆ एकनाथ शिंदे यांचे घर ते
सोनबा पाचरुट नाली
बांधकाम करणे.
◆ एकनाथ शिंदे घर ते सोनबा
पाच रुट यांचे घर सिमेंट
रस्ता.
◆ महाडिक यांचे घर ते भिसे
यांचे घर नाली बांधकाम
करणे.
◆ महाडिक यांचे घर ते भिसे
यांचे घर सिमेंट रस्ता.
सखाराम जाधव यांचे घर ते
मजीदभाई ह्यांचे घर नाली
बांधकाम.
◆ भोजने यांचे घर ते गणेश
मंदिरापर्यंत सिमेंट
रस्ता.
◆ सावरकर चौक ते छत्रपती
चौक सिमेंट रस्ता.
◆ जय भवानी कॉलनी सिमेंट
रस्ता.
◆ केरुळ रोड ते जिल्हा परिषद
शाळा नंबर १ सिमेंट रस्ता.
◆ शेरी रोड ते इंडिया बँकेपर्यंत
सिमेंट रस्ता ,वेशीपासून ते
घावटे गल्लीपर्यंत सिमेंट रस्ता.
◆ रवी पंडित यांचे घर ते सावरकर चौकापर्यंत सिमेंट रस्ता.
इत्यादी कामे आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले असून त्यासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.यावेळी उपस्थित संरपच अनिल तात्या ढोबळे, ऊपसंरपच योगेश भंडारी, माजी ऊपसंरपच संभा दादा कर्डिले, माजी सभापती संजय ढोबळे, सभापती रमजान शेठ तांबोळी, रामशेठ मधुरकर सचिन घावटे, नवनाथ ढोबळे, मनोज यादव (सर) अमोल कर्डिले, आप्पा आेव्हाळ, बालु शेठ कर्डिले आदी उपस्थित होते.



















